Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप

बिबट्याचा हल्ला नाशिक,www.pudhari.news

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणालगतच्या शेतात गवत कापत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला (Nashik Leopard Attack) करत जखमी केल्याची घटना घडली. यामुळे मुकणे गावकऱ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुकणे येथील प्रकाश बोराडे हा युवक दुपारी 4 च्यादरम्यान जनावरांसाठी गवत कापायला मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणालगत शेतावर गेला होता. गवत कापत असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रकाशवर मागून हल्ला केला. दोघांमध्ये बराच वेळ झटापट सुरू असताना आरडाओरड एकूण जवळील विटभट्टीवरील कामगार तसेच काही शेतकऱ्यांनी धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. जखमी अवस्थेतील प्रकाशला त्यांनी तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

वनविभाग तात्पुरत्या स्वरूपात पिंजरा लावतात. मात्र, पिंजऱ्यात काहीही भक्ष्य ठेवत नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वनविभागाने तत्काळ बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा :

The post Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप appeared first on पुढारी.