Nashik Lockdown : नाशिककरांना लॉकडाऊन हवाय का? कोरोनाचा विळखा असूनही नागरिक बेजबाबदार का?

<p>राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरी भागात परसलेला कोरोना आता तळगळापर्यंत पोहोचला आहे. कोरोना रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही कमी कमी झाला आहे, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. &nbsp;</p>