Nashik Lockdown | नाशिककरांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन; पोलिस आयुक्तांचा इशारा

<p>नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून आता नाशिक पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झालाय. &nbsp;शहरातील 25 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, यापैकी 2 पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक शहरात गेल्या 5 दिवसात तब्बल 4 हजार 138 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळं रुग्ण वाढत राहिले आणि नागरिक नियमांचे पालन करत नसतील तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलाय. &nbsp;</p>