Nashik Malegaon दगडफेकीप्रकरणी बंद पुकारणारी रझा अकादमी संघटना पोलिसांच्या रडारवर: ABP Majha

<p>नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात शुक्रवारी झालेल्या दगडफेकीप्रकरणी बंद पुकारणाऱ्या रझा अकादमी संघटना पोलिसांच्या रडारवर आली आहे. मालेगावातील लल्ले चौकातील कार्यालयावर छापा मारत स्थानिक पोलिसांनी २ तास झडती घेतली. त्यात बंदचं आवाहन करणारी पत्रकं आणि दस्तावेज जप्त केले. पोलिसांच्या छाप्यामुळे अन्य धार्मिक संघटनाही हादरल्या आहेत. त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ रझा अकादमी संघटनेनं बंदची हाक दिली होती. यावेळी पोलिसांनी पंचांसमोर कार्यालयाचं कुलूप तोडून झडती घेतली. त्यात बंदचं आवाहन करणारी उर्दू भाषेतील काही पत्रकं पोलिसांनी जप्त केली आहेत. यासह एक रजिस्टर आणि काही पुस्तकंही ताब्यात घेतली.</p>