Nashik Malegaon : प्रक्षोभक वक्तव्यप्रकरणी शहरातील दोघे ताब्यात

ताब्यात,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयास्पद पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखादेखील हरकतमध्ये आली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून शहरातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज मंगळवारी पहाटे ही कारवाई झाली.

इमाम कौन्सिलचे राज्याध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी आणि पीएफआयचे सादेन शाहिद इकबाल यांना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्यावर भादंवि कलम १५१ अन्वये कारवाई करण्यात येत असून दुपारुन मालेगाव न्यायालयात हजर केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik Malegaon : प्रक्षोभक वक्तव्यप्रकरणी शहरातील दोघे ताब्यात appeared first on पुढारी.