Nashik Manmad : पाण्याचे दुर्भिक्ष असूनही ध्येयवेड्या तरुणाने जगवली 80 झाडे

Nashik Manmad,www.pudhari.news

Nashik Manmad  : रईस शेख एकीकडे शहरात पाण्याची भीषण पाणीटंचाई.. नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. घरी पाहुणे आले तरी त्यांना पिण्यासाठी कसंबसं पाण्याची व्यवस्था करावी लागते. पण अशाही स्थितीत वृक्षारोपण करून त्यांचे यशस्वीरीत्या संगोपन करण्याचे काम येथील एका ध्येयवेड्या पर्यावरणप्रेमीने केले आहे.

संदीप सांगळे असे या अवलियाचे नाव असून, त्याने मनमाडसारख्या (Nashik Manmad) पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या शहरात एक-दोन नव्हे, तर 80 झाडांचे संगोपन केले आहे. मात्र, ही झाडे जगण्यासाठी त्याला करावी लागलेली कसरतही तशीच आहे. बॉटलद्वारे पाणी देऊन सांगळे यांनी ही झाडे जगवली आहेत. चार वर्षांपूर्वी लावलेली रोपे आता बहरली आहेत. बुधलवाडी भागात राहणाऱ्या संदीप या तरुणाने ही झाडे स्टेडियम भागात स्वतः एकट्याने खड्डे खोदून लावली आणि जगवली आहेत. त्यासाठी त्यांनी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्या आणि त्या बाटल्यात घरी असलेल्या बोअरवेलच्या पाण्याने भरून त्या दुकाचीवरून नेत प्रत्येक झाडाला रोज एक ते दोन बाटल्या पाणी टाकू टाकून जिवंत ठेवले.

संदीप हा एका सहकारी पतसंस्थेत अल्पबचत प्रतिनिधी म्हणून काम करतो. दिवसभराचे आपले काम आटोपल्यानंतर तो सायंकाळी घरी गेल्यावर झाडांना पाणी देण्याचे काम करतो. या कामात त्याला त्याचा आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगी सर्व जण साथ देतात. त्याच्या कामाची दखल घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी त्याचे कौतुक करत सन्मान केला आहे. या कामात त्याला त्याचा आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगी सर्व जण साथ देतात. त्याच्या कामाची दखल घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी त्याचे कौतुक करत सन्मान केला आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Manmad : पाण्याचे दुर्भिक्ष असूनही ध्येयवेड्या तरुणाने जगवली 80 झाडे appeared first on पुढारी.