Nashik Murder : चाकूचे छातीवर व पोटात वार करुन युवकाचा खून

murder

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरुच असून आज अंबड गाव व परिसरात महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ मयुर दातीर (२०) या युवकाचा खून झाला आहे. मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी मयुरच्या छातीवर व पोटावर चाकुने वार करत त्याची हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर हा दुचाकीवर महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ आज  दुपारी २ वाजता आला असता दुचाकीवर त्याचा पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्याच्या छातीवर व पोटावर सपासप चाकुने वार करून त्याचा खुन केला.

घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेत असून त्यातील एकजण अट्टल गुन्हेगार असल्याचे समजते आहे.

हेही वाचा :

The post Nashik Murder : चाकूचे छातीवर व पोटात वार करुन युवकाचा खून appeared first on पुढारी.