Nashik murder : शेतीच्या वादातून माेठ्या भावाची हत्या करणारा साथीदारांसह जेरबंद

अटक,www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

शेतीच्या वादातून माेठ्या भावाची हत्या करून अपघाताचा बनाव करणाऱ्या लहान भावास त्याच्या दाेन साथीदारांसह म्हसरूळ गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. या तीनही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. यातील चाैथा संशयित पसार असून, त्याच्या शाेधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे.

दीपक साहेबराव कराड (३५, रा. फ्लॅट नं. ११, तेजप्रतीक सोसायटी, मखमलाबाद नाका, पंचवटी) खंडू निवृत्ती सानप (५३) व रुद्र सुरेश पिंपळे (४९, दाेघे रा. शिवरे, ता. निफाड, नाशिक) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. दीपक कराडसह त्याच्या तीन साथीदारांनी ज्ञानेश्वर साहेबराव कराड (४०, रा. नर्सरीसमोर, कराड मळा, मखमलाबाद) यांची हत्या केल्याचे शुक्रवारी (दि. १३) मखमलाबाद गावातील कराड मळा येथे उघडकीस आले हाेते. माेठा भाऊ सावत्र आईला मदत करताे व त्याने शेतजमीन आणि प्राॅपर्टी आईच्या नावे केल्याचा राग धरून दीपकने माेठा भाऊ असलेल्या ज्ञानेश्वरची निर्घृण हत्या करून ताे अपघात असल्याचे दर्शविले, असे फिर्यादीत नमूद आहे. शुक्रवारी (दि. १२) ज्ञानेश्वरच्या आईने लहान मुलगा दीपकला फोन करून, ज्ञानेश्वर घरी पोहोचलेला नसल्याचे कळविले होते. त्यावेळी दीपक हा मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने शोध घेत असताना ज्ञानेश्वर हा दुचाकीसह गायकवाड मळ्यासमोर पाटात रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला आढळला होता. ही माहिती म्हसरूळ पोलिसांना कळविण्यात आली. शवविच्छेदन अहवालात संशयास्पद मृत्यू व डाेक्यावर गंभीर वार असल्याचे नमूद करण्यात आले हाेते. त्यानुसार प्राथमिक तपास, मृत ज्ञानेश्वर यांची पत्नी वंदना यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात दिलेली फिर्याद व शवविच्छेदन अहवालानुसार चाैघांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. फरार असलेल्या चाैथ्या संशयिताला पकडण्यासाठी म्हसरूळ पाेलिसांचे पथक रवाना झाले असून, ते तळ ठाेकून हाेते.

यांनी बजाविली कामगिरी
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, विनायक आहिरे, हवालदार बाळासाहेब मुर्तडक, पोलिस नाईक सतीश वसावे, पोलिस अंमलदार योगेश ससकर, प्रशांत देवरे, जितू शिंदे, पोलिस वाहनचालक रमण लाडे यांनी ही कामगिरी बजाविली.

हेही वाचा : 

The post Nashik murder : शेतीच्या वादातून माेठ्या भावाची हत्या करणारा साथीदारांसह जेरबंद appeared first on पुढारी.