Nashik Navratri Story : नाशिककरांकडून कालिका मातेचं दर्शन; महिलांमध्ये मोठा उत्साह!

<p>आज पासून देशभर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. नाशिकच्या कालिका मातेच्या मंदिरात ही भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. आज पिवळा रंग असल्याने अनेक महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसत देवीचं दर्शन घेतलं. खूप दिवसांनी आपल्या देवीचं थेट गाभऱ्यातून दर्शन घेता आल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आले.</p>