नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दीपावलीनिमित्त नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयासह तालुका न्यायालयांना येत्या सोमवार (दि.१३) पासून शनिवार (दि.१८)पर्यंत सुटी राहणार आहे. तसेच दुसरा शनिवार असल्याने ११ नोव्हेंबर, रविवारी (दि.१२) सलग शासकीय सुट्टी आल्याने ११ ते १८ नाेव्हेंबर अशी सुटी न्यायालयास जाहीर झाली आहे.
न्यायालयास दरवर्षी दिवाळीनिमित्त आठवडाभर सुटी दिली जाते. यावर्षी दुसरा शनिवार व रविवार आल्याने एकूण नऊ दिवसांची सुटी न्यायालयीन अधिकारी, कर्मचारीवर्गाला मिळाली आहे. शुक्रवार (दि.१०)पर्यंत न्यायालयीन कामकाज नियमितपणे होणार आहे. शनिवारी व रविवारी (दि.११ व १२) न्यायालये बंद राहणार आहेत. १३ ते १८ नोव्हेंबर अशी दिपावलीची सुटी जाहिर असून १९ नोव्हेंबरला रविवार असल्याने न्यायालयास दिवाळीनिमित्त सलग नऊ दिवस सुट्टी राहणार आहे. तर सुट्टीच्या दिवशीही काही न्यायालये सुरु राहणार आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचेही कामकाज या काळात बंद राहणार आहे.
हेही वाचा :
- नाशिक : सायकल खेळण्यावरून वृद्धेला मारहाण; अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल
- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’: गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची गोष्ट
- रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा हक्काची : उदय सामंत
The post Nashik News : दिवाळीनिमित्त न्यायालयास 9 दिवसांची सुटी appeared first on पुढारी.