
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; त्रिरश्मी बुद्धलेणी येथील बुद्धस्मारकाच्या परिसरात विजयादशमीनिमित्त मंगळवारी (दि. २४) श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधीवृक्षाच्या यांचा फांदीचे रोपण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. या महोत्सवास देश-विदेशातून व जिल्ह्यांतून महत्त्वाच्या व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. वृक्षाचे रोपण करण्यासाठी श्रीलंकेचे हेमरथाना नायक थेरो, मलेशियाचे सरणंकरा महाथेरो, थायलंड येथील डॉ. पोरंचाई पलावाधम्मो यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या ऐतिहासिक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून राज्याचे नागरी अन्न, पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन त्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा व्यवस्था समावेश आहे. तसेच भुजबळ यांनी सोमवारी बोधीवृक्ष रोपणाची जागा, बुद्धस्मारक तसेच मुख्य कार्यक्रम हॉल व मंच या ठिकाणी भेट देऊन उर्वरित अनुषंगिक बाबींची पूर्तता त्वरेने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या महोत्सवास देश-विदेशातून व जिल्ह्यांतून महत्त्वाच्या व्यक्ती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, त्यांची सुरक्षितता व अनुषंगिक सोयी सुविधांचे काटेकोर नियोजन करण्यात यावे अशा सूचना भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षितेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा सूचनाही भुजबळांनी केल्यात. यावेळी पोलिस उपआयुक्त मोनिका राऊत, शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य संयोजक भन्ते सुगत थेरो, माजी खासदार समीर भुजबळ, समिती सदस्य आनंद सोनवणे, माजी नगरसेवक बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- नागपूर : भारत सर्व क्षेत्रात वेगानं पुढे जात आहे : सरसंघचालक मोहन भागवत
- Lalit Patil : ललित पाटील सुरुवातीपासूनच करीत होता ‘ड्रामा’
- Rohit Pawar : मराठा आरक्षणावर राजकारण करू नका : आमदार रोहित पवार
The post Nashik News : बोधीवृक्ष फांदीचे आज रोपण appeared first on पुढारी.