Nashik News : बोधी वृक्षारोपणानिमित्त वाहतूक मार्गात बदल

वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पांडवलेणी येथील बौद्ध स्मारक येथे मंगळवारी (दि. २४) बोधी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तसेच, नागरिकांचीही गर्दी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबत शहर वाहतूक विभागाने अधिसूचना काढली आहे.

इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांडवलेणी येथील बौद्ध स्मारक येथे बोधी वृक्षारोपण केले जाणार आहे. पहाटे 6 पासून कार्यक्रम संपेपर्यंत या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक मार्गात बदल व पर्यायी मार्गांबाबत अधिसूचना जारी केली आहे.

प्रवेश बंद मार्ग

– क्लिक हॉटेल ते गरवारे टी पॉइंट या इंदिरानगर बाजूकडील सर्व्हिस रोडवरून दुतर्फा मार्गावरील वाहतुकीस प्रवेशबंदी

– फेम सिग्नल ते कलानगर – पाथर्डी गाव सर्कल – पाथर्डी फाटा – गरवारे टी पॉइंट मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी

– गरवारे टी पॉइंट ते पाथर्डी फाटा – पाथर्डी गाव सर्कल – कलानगर – फेम सिग्नल मार्गावर प्रवेश बंदी

पर्यायी मार्ग

– क्लिक हॉटेल – गरवारे टी पॉइंट मुंबईकडे जाणारी सर्व वाहने क्लिक हॉटेल रॅम्पवरून मुंबईकडे

– फेम सिग्नलकडून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना द्वारका सर्कलमार्गे रॅम्पवरून उड्डाणपुलावरून मुंबईकडे

– गरवारेकडून नाशिकरोडकडे जाणारी अवजड वाहने ओव्हरब्रिजवरून द्वारका सर्कल – फेम सिग्नलवरून नाशिकरोडकडे

– पाथर्डी गावाकडून गरवारे, मुंबईकडे जाणारी सर्व वाहने पाथर्डी फाटा – ताज बोगदामधून अंबड सर्व्हिसरोड – महिंद्रा शोरूम – सुदाल कंपनी – गरवारे टी पाइंटकडून गौळाणेमार्गे मुंबईकडे

हेही वाचा : 

The post Nashik News : बोधी वृक्षारोपणानिमित्त वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.