नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा ; राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शनिवारी (दि. २१) सकाळी १० वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शासकीय नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण आणि नाशिक येथील एमडी ड्रग्स प्रकरणी कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होईल.
आंदोलनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पुरुषोत्तम कडलग, नितिन निगळ, शाम हिरे, गणेश गायधानी आधी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा :
The post Nashik News : राष्ट्रवादीचे शनिवारी रेल्वे रोको आंदोलन appeared first on पुढारी.