Nashik News : सफाई कर्मचारी महिलेकडून गरोदर महिलेला धक्काबु्क्की, बाळ दगावल्याचा आरोप, नाशिकमधील जिल्हा रुग्णालयातील घटना

<p>नाशिक जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आलीय. गरोदर महिलेला एका सफाई कर्मचारी महिलेनं धक्काबुक्की केल्यानं आणि प्रसूतीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नसल्यानं बाळ दगावल्याचा आरोप महिलेनं केलाय. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनानं चौकशी समिती नेमली असून आज दुपारपर्यंत या समितीचा अहवाल अपेक्षित आहे. पेठ तालुक्यातली एक गरोदर महिला दोन दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. ही महिला बाथरुममध्ये जात असताना सफाई कामगार महिलेनं तिला अडवलं आणि धक्काबुक्की केली असा आरोप त्या महिलेनं केला. या प्रकरणी चौकशीत कुणी दोषी आढळला तर कठोर कारवाई करू असं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिलंय.</p>