Nashik Onion : नाशिक जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांद्याचा लिलाव

<p>नाशिक जिल्ह्यातल्या उमराणे बाजार समितीत आज दसऱ्याच्या मुहूर्तावर नविन लाल कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या लाल कांद्याच्या खरेदीचा लिलाव सुरु करण्याची परंपरा आहे. आज शुभारंभाच्या वेळी उमराणे परिसरातील रणजीत देवरे या शेतकऱ्याच्या कांद्याला क्विंटलमागे ५ हजार ५१ रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला आहे. कमीत कमी ९०० ते सरासरी &nbsp;२ हजार ५०० ते ३ हजार रुपये भाव जाहीर झाला. यंदा पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने मागिल वर्षीच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी प्रमाणात नविन कांद्याची आवक झाली होती. आज मिळालेल्या भावा प्रमाणेच यापुढेही दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.</p>