Nashik Oxygen Leak : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयाला भेट देण्याची शक्यता
<p><strong>नाशिक :</strong> झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटना प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हलगर्जीपणा करत इतरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्या प्रकरणी भादवी 304 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या घटनेची चौकशी करणार आहे. </p>