
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस खात्यात सेवा बजावणाऱ्या अंमलदारांसाठी २०१३ मध्ये उपनिरीक्षक पदासाठी खातेअंतर्गत सरळसेवा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत नाशिकसह राज्यातील अनेक अंमलदार उत्तीर्ण झाले. मात्र, न्यायालीन प्रक्रिया झाल्याने अनेकांच्या पदोन्नती रखडल्या होत्या. २०२१ मध्ये या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २५ टक्के रिक्त जागांवर नुकतेच ३८५ कर्मचाऱ्यांची उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस दलाच्या आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक पोलिस आयुक्तालयातील १२ व ग्रामीणचे २३ अंमलदार फौजदार झाले आहेत.
नाशिक शहरातील हवालदार सूर्यकांत सोनवणे, संजय मोहिते, मनोज विशे, केशव आडके, दत्तात्रय चव्हाणके, पोपट माळोदे, मुनिरोद्दीन काझी, मंगेश करडेल, वाळू लभडे, नंदू देशमुख, अनिल दिघोळे, इम्तियाजअली सय्यद हे उपनिरीक्षक झाले आहेत. तर नाशिक ग्रामीणचे कैलास खैरनार, मेहमूद सय्यद, माणिक देशमुख, इकलाख सय्यद, सुनील बावा, सुनील गीत, लक्ष्मण कुलकर्णी, श्यामराव गडाख, संजय विधाते, सुखदेव मुरकुटे, शिवाजी जुंदरे, दीपक दोडे, मखराम राठोड, यल्लप्पा खैरे, गणेश देवरे, शिवाजी गुंजाळ, संजीव पाटील, नितीन मंडलिक, बबन सोनवणे, रवींद्र भागवत, रवींद्र वानखेडे, गोविंद चौधरी, सुनील जाधव हे उपनिरीक्षक झाले आहेत.
फौजदार होण्याचे स्वप्न अधुरे
पोलिस दलात भरती झाल्यापासून अंमलदारांचे उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न असते. यासाठी खातेअंतर्गत परीक्षा किंवा बढती हे पर्याय असतात. दरम्यान, पोलिस आयुक्तालयातील अंमलदार शिवदास भाऊराव निकम (५७, रा. म्हसरूळ) यांनीही हे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यांचे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले. मात्र, त्याआधीच निकम यांनी आठ दिवसांपूर्वीच आजारपणाच्या नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले.
हेही वाचा :
- सांगली जिल्ह्यात दिवसभरात तीन खून
- Monsoon Update : अरबी समुद्रात बाष्पयुक्त वार्यांना वेग; 7 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात पोहोचण्याचा अंदाज
- पुण्यातील सात अतिधोकादायक वाडे उतरविले
The post Nashik Police : नाशिकचे ३५ अंमलदार झाले फौजदार! appeared first on पुढारी.