Nashik Police : खाकीतले दर्दी… कामात आली वर्दी

nashik police,www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
बस आणि डंपर यांच्या शनिवारी पहाटे भीषण अपघात होऊन 12 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिकजण जखमी झाले. या भीषण अपघातानंतर बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांनी (Nashik Police) मोठी भूमिका बजावली. त्यामुळे खर्‍या अर्थाने ‘खाकीतले दर्दी, कामात आली वर्दी’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त झाली.

या अपघाताची माहिती कळताच पोलिस (Nashik Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने मदत कार्य केले. दाखल झालेल्या अग्निशामक दलातील कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने पोलिसांनी आग विझवण्यासाठी मदत केल्याचे चित्र यावेळी दिसून आली. तसेच नागरिकांबरोबर बसच्या दरवाजा, खिडक्यांच्या काचा फोडून शक्य तितक्या प्रवाशांना रुग्णालयात हलविले. तसेच रस्त्याने जाणारी सिटीलिंकची बस थांबवून प्रवाशांना जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे आणले. घटनास्थळावरील द़ृश्य मन सुन्न करणारे असताना मन कठोर करत मदत करणारे पोलिस पाहून खाकीतले दर्दी अशी भावना सहजपणे व्यक्त होत होती.

यांनी बजाविली कामगिरी
आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख, पोलिस उपनिरीक्षक देवरे, पोलिस हवालदार सुरेश नरवडे, पोलिस नाईक नीलेश काटकर, देवीदास गायकवाड, पोलिस शिपाई वैभव परदेशी, सचिन बहीकर, राकेश बनकर, गावित, देशमुख, सहायक पोलिस उपनिरीक्षक शिंदे तसेच पंचवटी ठाणे सहायक पोलिस निरीक्षक सत्यम पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड, अनिल गुंबाडे, कुणाल पचलोरे, राकेश शिंदे, कल्पेश जाधव, अंबादास केदार होते. म्हसरूळ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक आहिरे, पोलिस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, देवराम चव्हाण, पोलिस शिपाई गुंबाडे होते. तर भद्रकाली ठाण्याचे शोध पथक, शिपाई विशाल काठे आदी होते.

हेही वाचा :

The post Nashik Police : खाकीतले दर्दी... कामात आली वर्दी appeared first on पुढारी.