Nashik Police Mock Drill : नाशिक पोलिसांचं मॉकड्रील पाहून नाशिककर बुचकळ्यात, कोरोनाच्या नियमांचा भंग

<p>व्हिडीओतील दृश्य पाहिल्यानंतर पोलीस नेमकं कोणतं आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पुढची दृष्य पाहिल्यावर नक्कीच पडेल. मात्र हे आंदोलन नव्हे तर नाशिक पोलिसांनी आयोजित केलेलं मॉकड्रिल आहे. रस्त्यावर टायरची जाळपोळ, पोलिसांच्या दिशेनं होणारी दगडफेक, पोलिसांनी फोडलेल्या अश्रूधुरांच्या नळकांड्या हे सगळं चित्र पाहून काही काळासाठी नाशिककरही बुचकळ्यात पडले होते.&nbsp;</p>