Nashik Potholes : नाशिक शहरात खड्ड्यांचं साम्राज्य; रस्ते दुरुस्ती करा, नागरिकांची मागणी ABP Majha

<p>दोन दिवसांच्या संततधार पावसामुळेच नाशिक शहरातील रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडल्याने नाशिक महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. चिखलमय झालेले रस्ते, खड्ड्यात साचलेले पाणी, रस्त्यावर पसरलेली खडी यामुळे रस्त्यांवरून प्रवास करतांना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. शहरातील जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांसह कॉलनी रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झालीय आणि यामुळे अनेक ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना देखिल करावा लागतोय. खरं तर पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणं हे काही नाशिककरांना नविन नाही. नाशिककरांनी पालिकेविरोधात आवाज उठवताच रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थेच बघायला मिळत असल्याने महापालिका बांधकाम विभागाच्या रस्त्यांच्या कामांबाबतही शंका उपस्थित केली जातीय. दरम्यान नाशिकमधील या खड्डयांचा पेठरोड वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..&nbsp;&nbsp;</p>