Nashik Rain : ऐन दिवाळीत नाशिकमध्ये अवकाळी पाऊस; भात शेती, वरी आणि इतर पिकांचं मोठं नुकसान

<p>ऐन दिवाळीत अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांना झोडपून काढलं. या पावसामुळे भात शेती, वरी, भाजीपाला, टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी आणि डोळ्यातही पाणी असं विदारक चित्र आज दिसलं. पीक वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करत असताना दिसतोय.</p>