Nashik Rain : गोदापत्रात तरुणांचा जीवावर बेतणारा अतिउत्साहीपणा, वाहून जाणाऱ्या तरुणांना वाचवण्याच यश
<p>नाशिकच्या गोदा पत्रात वाहून जाणाऱ्या वाहून जाणाऱ्या तरुणाचा सुटकेचा थरार गोदा काठावर बघायला मिळाला, सुटकेचा हा थरार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झालाय, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय, तरी देखीलया पुराच्या पाण्यात पोहण्याचे जिवघेणे धाडस अनेक जण करत आहेत, पूर बघण्यासाठी आलेल्या दोन तीन जणांनी <span class="il">गोदावर</span>ी नदीपात्रात उड्या मारल्या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्यातील एक जण वाहून गेला जवळ्पास 300 ते 400 मीटर पर्यत पोहत जाऊन आदिवासी जीवरक्षक दलाच्या जवानांनी तरुणाचे प्राण वाचवले, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या सूचना देण्यात आल्यात मात्र तरीही पूर बघणाऱ्याची गर्दी होत आहे, त्यांना हटकणारे कोणीच नसल्यानं गर्दीवर नियंत्रण नाहीत त्यामुळे आशा घटना घडत आहेत.</p>
<p> </p>