Nashik Sammelan : मनसेच्या आक्षेपानंतर साहित्य संमेलन गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्पष्ट उल्लेख

<p>नाशिकच्या साहित्य संमेलनाच्या गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याचा आक्षेप मनसेनं घेतल्यानंतर आता सावरकरांचा उल्लेख ठळकपणे करण्यात आला आहे. या गीतात आधी स्वातंत्र्याचे सूर्य उगविले अनंत क्षितिजावरती असा उल्लेख होता. मनसेच्या आक्षेपानंतर आता आणखी स्पष्ट नोंद करण्यात आलीय. स्वातंत्र्यवीर सावरकर उजळे अनंत क्षितिजावरती असा बदल संमेलन गीतात करण्यात आला आहे.&nbsp;</p>