Nashik Schools : नाशिक शहरातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार, आयुक्त कैलास जाधव यांची माहिती

<p>नाशिकमधील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. सरकारच्या निर्णयानुसार शाळा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं. नाशिकमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. शिक्षणतज्ज्ञांनीही शाळा सुरु कराव्यात असं मत व्यक्त केलंय. त्यामुळे खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्यात.</p>