Nashik Shiv Janmatsavam : सातपूरला सर्वपक्षीयांतर्फे शिवजन्मोत्सवाची तयारी

सातपूर, शिवजन्मोत्सव www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

येथे गेल्या पाच वर्षांपासून सर्वपक्षीयांतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. हा सोहळा यंदाही जोरदार साजरा करण्याचा निर्णय सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या नियोजन बैठकीत सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने लाखो रुपयांची देणगी शिवभक्तांनी यावेळी जाहीर केली.

बैठकीत गेल्या वर्षीचा लेखाजोखा खजिनदार जीवन रायते यांनी मांडला. यावेळी छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर यांनी दरवर्षीपेक्षा अधिक जोमाने शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच जी देणगी आपल्याकडून देणे दिलेल्या वेळेत शक्य होणार आहे अशी देणगी बैठकीत घोषित करावी, अशी सूचना केली. यानंतर महेंद्र शिंदे, संजय राऊत, बाळासाहेब जाधव, डॉ. वृषाली सोनवणे, डॉ. अमोल वाजे आदींसह मान्यवरांनी त्यांची मते व्यक्त केली. दिनकर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जाेतिबा फुले या तीनही महापुरुषांचा जयंती उत्सव एकत्रित साजरा करण्याबाबत सूचना केली. तसेच शिवजन्मोत्सवाला शिवप्रेमींनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही केले.

यावेळी गणेश बोलकर, समाधान देवरे, धीरज शेळके, गोकुळ निगळ, अमोल पाटील, नितीन निगळ, निवृत्ती इंगोले यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, शिवप्रेमी, शिवजन्मोत्सव समिती सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik Shiv Janmatsavam : सातपूरला सर्वपक्षीयांतर्फे शिवजन्मोत्सवाची तयारी appeared first on पुढारी.