Site icon

Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त

सिन्नर(जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा

तालुका कॉंग्रेस कमिटीची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारात घेऊन नूतन कार्यकारणी लवकरात लवकर करण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीने सिन्नर तालुका तालु्नयातील काही व्यक्तींना परस्पर जिल्हा कमिटीत स्थान दिले. त्यामुळे तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते संतप्त झाले असून तातडीच्या बैठकीत तालुका बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला.

तालुकाध्यक्ष विनायक सांगळे अध्यक्षस्थानी होते. बैठकीत जिल्हा कॉंग्रेस कमिटीबद्दल तीव्र नाराजीचा सूर होता. आजपर्यंत कार्यकर्ते प्रामाणिकपणे पक्षाचे काम करत आले आहेत. तालुका कॉंग्रेस कमिटीला विश्वासात न घेता जिल्हा कॉंग्रेस कमिटीवर काही नियु्नत्या करण्यात आल्या. ही बाब पदाधिकाऱ्यांना खटकली. त्यामुळे जिल्हा कॉंग्रेस कमिटीने सिन्नर तालुक्यातून घेतलेल्या जिल्हा कॉंग्रेस कमिटीवरील नियु्नत्या तत्काळ रद्द कराव्यात. तालुका कॉंग्रेस कमिटीच्या ठरावाच्या व्यतिर्नित कमिटीला विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारच्या नियुक्ती करण्यात येऊ नये असे ठराव बैठकीत मांडण्यात आले. जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना यासंदर्भात अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष सांगळे म्हणाले.

यावेळी शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, तालुका समन्वय उदय जाधव, अश्फाक शेख, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष झाकीर शेख, महिला तालुकाध्यक्षा नंदा पडवळ, कार्याध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, भावेश शिंदे, ज्ञानेश्वर लोखंडे, उपाध्यक्ष संतोष जोशी, शिवराम शिंदे, बाळासाहेब शिंदे, सोमनाथ बिडवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुकाध्यक्षपद सोडण्यात तयार : सांगळे
विनायक सांगळे यांनी तालुका कॉंग्रेस कमिटीवर कोणी तालुकाध्यक्ष होण्यास इच्छूक असेल तर चांगल्या व योग्य निवडीकरिता पद सोडण्यास तयार असल्याची भूमिका मांडली. आपण कोणत्याही पदाकरिता अट्टाहास करणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्य कृषी सेलच्या सरचिटणीसपदी चंद्रकांत डावरे यांची निवड झाल्याबदल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याचप्रमाणे धोंडबारचे मच्छिंद्र खेताडे यांची तालुका सेलपदी निवड करण्यात आली.

‘त्या’ नियु्नत्या रद्द होईपर्यंत बहिष्कार’
जिल्हा कॉंग्रेस कमिटीवरती झालेल्या नियु्नती रद्द करण्यात येणार नाही तोपर्यंत सिन्नर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या बैठका व सूचनांवर बहिष्कार टाकण्यात येईल. येत्या आठ ते दहा दिवसांत ही कार्यवाही करावी. तथापि, याबाबत दिरंगाई केल्यास तालुका पदाधिकारी सामुदायिक राजीनामे देतील, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. सिन्नर तालुका कॉंग्रेस कमिटीमध्ये गटतटाचे राजकारण माजविण्याचा प्रयत्न जिल्हा पदाधिकाऱ्यांनी करू नये. अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या ज्येष्ठांचीच जिल्हा कमिटीवर नियु्नती झाली पाहिजे, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik Sinner : जिल्हा विरुध्द तालुका कॉंग्रेस वाद उफाळला, कार्यकारणी बरखास्त appeared first on पुढारी.

Exit mobile version