Site icon

Nashik tour : उद्यापासून संभाजी महाराज दोन दिवस नाशिक दौऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी शनिवार (दि.२४) पासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी (दि.२४) सकाळी ११ वाजता त्यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. दुपारी ४ वाजता नांदूर नाका येथील यश लॉन्समध्ये स्वराज्य पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा होईल. त्यानंतर रविवारी (दि. २५) सकाळी १० वाजता छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी समितीच्या बक्षीस वितरण सभारंभात तसेच मविप्र संस्था गौरव छत्रपती शाहू महाराज जीवन विचार व्याख्यानमाला कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम रावसाहेब सभागृह येथे होणार आहे. त्यानंतर कालिदास येथे राजर्षी शाहू महाराज विचार जागर स्पर्धेच्या बक्षीस वितरण सभारंभात ते अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती संपर्कप्रमुख करण गायकर यांनी दिली.

हेही वाचा:

The post Nashik tour : उद्यापासून संभाजी महाराज दोन दिवस नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Exit mobile version