<p>नाशिकमध्ये भाजीपाल्यांचे भाव कडाडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गेल्या पाच दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून 25 ते 30 टक्क्याने भाज्या महागल्या आहेत. बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनूसार तोकते चक्रीवादळाचा फटका, भाज्यांची कमी झालेली आवक, लिलाव सुरळीत नाही, शेतकऱ्यांमध्ये असलेली कोरोनाची भिती तसेच कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम यामुळे ही सर्व परिस्थिती उदभवली असून आठ ते दहा दिवसात दर नियंत्रणात येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.</p>