Nashik Water Crisis : नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार, आजच्या बैठकीकडे नाशिकचं लक्ष

<p>नाशिक शहरातील पाणी कपातीसंदर्भात महापौर सतीश कुलकर्णी यांनी आज महत्वाची बैठक बोलवलीय. या बैठकीत महापालिका अधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेते उपस्थित राहतील. गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा 25 टक्यांवर आल्यानं पाणी जपून वापरण्याच्या सूचना जलसंपदा विभाग आणि पालकमंत्र्यांनी दिल्यात. त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक असून त्यात पाणी कपातीचा निर्णय होणार का याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय.<br />&nbsp;</p>