Nashik : Yeola तील जगप्रसिध्द पैठणी आता टपाल पाकिटावर, नव्या टपाल पाकिटांचं अनावरण : ABP Majha

<p>येवल्यातील जगप्रसिद्ध&nbsp;पैठणी&nbsp;आता भारतीय डाक विभागाच्या पाकिटावर देखील दिसणार असून आज येवला&nbsp;पैठणी&nbsp;नगरीतच या&nbsp;पैठणी&nbsp;पदर असलेल्या डाक पाकिटाचे अनावरण&nbsp;पैठणी&nbsp;विणकर आणि डाक विभागाचे अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.&nbsp;&nbsp;पैठणी&nbsp;साडीला देखील जी आय मानांकन प्राप्त झाल्यामुळे या&nbsp;पैठणी&nbsp;साडीचा पदर डाक विभागाच्या स्पेशल कव्हरवर येणार आहे.महाराष्ट्र सर्कलमध्ये ज्या ज्या गोष्टींना जी आय मानांकन प्राप्त होते अशा सर्व गोष्टी डाक पाकिटावर छपाई केली जात असते. त्यामुळे आता संपूर्ण भारत भर आता&nbsp; जी आय मानांकन असलेली&nbsp;पैठणी&nbsp;डाक विभागाच्या स्पेशल कव्हरवर दिसणार आहे.</p>