Nashik ZP : आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार

जिल्हा परिषद सीईओ नाशिक,www.pudhari.news

नाशिक  : पुढारी ऑनलाइन डेस्क 

शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील 44 आयएएस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.  तसे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. यामध्ये, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लीना बनसोड यांचीही बदली करण्यात आली आहे. ठाणे येथे आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बनसोड यांची बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्त करण्यात आली आहे. आशिमा मित्तल या पालघर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. आज (दि.30) त्यांनी बनसोड यांच्याकडून नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला.

यावेळी जिल्हापरिषदेचे सर्व विभाग प्रमुख व तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. दरम्यान मावळत्या सीईओ लीना बनसोड यांना निरोप देताना जिल्हापरिषदेचे अधिकारी व कर्मचारी भावूक झाले होते.

हेही वाचा :

The post Nashik ZP : आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार appeared first on पुढारी.