
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ अभियंता (इवद/ ग्रापापु), वरिष्ठ सहायक या २ संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांमध्ये दि. १७, २० व २३ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. (Nashik ZP)
यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन हे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, नाशिक जि.प.च्या वेबसाइटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.
हॉल तिकीट डाउनलोड कुठून करावे – जिल्हा परिषद पदभरतीतील २ संवर्गाच्या परीक्षा या दि. १७, २० व २३ नोव्हेंबर रोजी होणार असून आयबीपीएस कंपनीच्या http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबर व ई-मेल आयडीवरदेखील हॉल तिकीटची लिंक पाठवण्यात आलेली आहे.
कुठल्या पदासाठी कधी होणार परीक्षा –
१७ नोव्हेंबर : कनिष्ठ अभियंता
२० नोव्हेंबर : कनिष्ठ अभियंता
२३ नोव्हेंबर : वरिष्ठ सहायक
हेही वाचा :
- human brain chip : मानवी मेंदूत चीप बसवण्याच्या प्रयोगाला अमेरिकेत मंजुरी
- व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्यामागे कारणे कोणती? जाणून घ्या
- शरद पवार- अजित पवार यांच्यात होणार्या भेटीने जनतेत संभ्रम : विजय वडेट्टीवार
The post Nashik ZP : जि.प.मध्ये विविध पदांसाठी १७ नोव्हेंबरपासून परीक्षा appeared first on पुढारी.