Site icon

Nashik ZP : शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आता मे मध्येच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेतील काही विभागप्रमुखांच्या बदल्या होणार हे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. मात्र, राज्यात जूनमध्ये झालेले सत्तांतर, बदली धोरण ठरविण्यास लागणारा विलंब या गोष्टींमुळे आतापर्यंत बदलीला मुहूर्त लागला नाही. त्यातच आता जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता जाहीर झाल्याने बदली प्रक्रिया लवकर होणार नाही, याची शाश्वती झाली आहे. तसेच या बदल्या आता मे महिन्यात सार्वत्रिक बदल्या म्हणून होणार असल्याचेदेखील समोर आले आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेतील अनेक विभागप्रमुख बदली आदेशाची आतुरतेने वाट बघत होते. त्यासाठी मंत्रालयात व्हाया जळगाव अशी फिल्डिंगदेखील लावली असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होत्या. मात्र, या बदल्यांना आता आचारसंहितेमुळे मुहूर्त लागत नसल्याने अनेकांनी केलेल्या अर्थपूर्ण नियोजनाला फटका बसणार आहे.

निवडणूक शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या करण्याचे शासकीय धोरण असले, तरी यंदा मात्र या धोरणात वेळोवेळी बदल करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या मार्च, एप्रिल महिन्यात संभाव्य निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती मागविली होती. त्यात अनेक अधिकाऱ्यांना एकाच जागेवर तीन वर्षे पूर्ण होत नसल्याने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकत नाहीत. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित अधिकारी असतील त्यांच्याच बदल्या करण्याचे ठरत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यामुळे बदल्यांचा विषयही मागे पडला.

हेही वाचा :

The post Nashik ZP : शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आता मे मध्येच appeared first on पुढारी.

Exit mobile version