Nashik ZP : झेडपी सीईओंच्या ‘सुपर ५०’चे वर्ग सुरू

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या ‘सुपर ५०’ या उपक्रमास गुरुवार (दि.२२)पासून मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. याबाबत विद्यार्थ्यांना वर्ग, राहण्याची व्यवस्था तसेच आयआयटी, जेaईईसाठी लागणारे संपूर्ण शिक्षण याची माहिती पहिल्या दिवशी देण्यात आली. आडगावनजीक असलेल्या उपाध्ये महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले असल्याची माहिती संस्थाचालक तथा काँग्रेसचे पदाधिकारी भारत टाकेकर यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सुपर ५०’ या उपक्रमास गुरुवारी (दि.२२) प्रारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागताला माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. डी. कनोज, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक सुधीर पगार, विस्तार अधिकारी मनीषा पिंगळकर, गटशिक्षणाधिकारी नीता चौधरी, विस्तार अधिकारी सी. पी. गवळी, समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, केंद्रप्रमुख मोकाशी, उपाध्ये कॉलेजचे संचालक भरत टाकेकर व प्राचार्य संतोष तिवारी उपस्थित होते.

‘सुपर ५०’तून जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ५० विद्यार्थ्यांना अकरावी व बारावी सायन्ससोबत जेईई, नीट निवड व सीईटी या प्रवेश परीक्षांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातर्फे २,१०० विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवडलेल्या ५० विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर त्यांची प्रवेशप्रक्रिया पार पडली आणि आजपासून प्रत्यक्षात मार्गदर्शन सुरू करण्यात आले.

हेही वाचा :

The post Nashik ZP : झेडपी सीईओंच्या 'सुपर ५०'चे वर्ग सुरू appeared first on पुढारी.