सप्तश्रृंगी-देवी नाशिक,www.pudhari.news

सप्तशृंगगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा
साडेतीन शक्तिपीठापैकी आद्यपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर सोमवारपासून (दि.26) 5 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या चैतन्यपर्वाचा समारोप 8 व 9 ऑक्टोबर दरम्यान कोजागरी पौर्णिमा उत्सवाने होणार आहे. तर आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्रीपासूनच ज्योत घेऊन जाणार्‍या भाविकांची गर्दी झाल्याचे चित्र होते.

आदिमायेच्या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या कामासाठी 21 जुलैपासून आदिमायेचे मंदिर भाविकांना दर्शनास बंद होते. दोन महिन्यानंतर 26 सप्टेंबर रोजी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे स्वयंभू दर्शन भाविकांना होणार असल्याने भाविकांना देवीच्या दर्शनाची आस लागली आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या उत्सवामध्ये ट्रस्ट व ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे. आदिमायेच्या प्रगट नवरूपाच्या दर्शनासाठी भाविकांची ऐतिहासिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवी संस्थान, जिल्हा आणि पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मंदिरे चोवीस तास खुले राहील.

पंचामृत पूजेनंतर होणार घटस्थापना
सकाळी देवीच्या विविध अलंकारांची वाजत गाजत मिरवणूक काढून देवीची सकाळी पंचामृत पूजा करून आरती करण्यात येणार आहे. तसेच 10 वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. मंदिराच्या कामाबाबत देवी संस्थानच्या निर्णयामुळे ग्रामस्थांसह भाविकांना देवीच्या दर्शनाची आस लागली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. गडावर येण्यासाठी खासगी वाहनांना बंदी करण्यात आली असून नांदुरी येथे मेळा बसस्थानक तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Navratri 2022 : चैतन्यपर्वास आजपासून प्रारंभ, नाशिकच्या सप्तशृंगी गडावर उत्साह appeared first on पुढारी.