Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ

अमरनाथ मंदिराचा देखावा,www.pudhari.news

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. शहरातील अनेक मंडळांनी साकारलेले देखावे व मंदिरांच्या प्रतिकृती भाविकांचे आकर्षण ठरले आहे.

बजरंग मित्रमंडळाचे हे पहिले वर्ष असून त्यांनी अमरनाथ मंदिराचा देखावा उभारला आहे. कड गल्ली बजरंग चौकातून मिरवणुकीची सुरुवात वणीचे उपसरपंच विलास कड, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड, माजी आमदार रामदास चारोस्कर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आली. मिरवणुकीत बँड पथक, ढोल पथक, वाद्यवृंदाच्या सहभागाने आनंदी व भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. बजरंग चौक आकर्षक रोषणाईने झगमगून निघाला होता. त्यात बजरंग मित्रमंडळाने अमरनाथ मंदिर प्रतिकृतीचा देखावा सादर केला. वणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे, प्रशांत कड, कारभारी कड यांच्या हस्ते देवीची पूजा व नवरात्र महाआरती करण्यात आली.

जगदंबा ग्रुपने उभारलेली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

नियोजन गणेश कड, मुन्ना शिंदे, मनोज जाधव, अंकुश जाधव, दीपक गायकवाड, नीलेश समदडिया, बाळा तपासे, राहुल मोरे, सचिन पवार, मोहित बर्डे, कमोद जाधव, योगेश हेगडे, रोशन पवार, सोनू शेख तसेच येथील जगदंबा ग्रुपने केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीत श्री जगदंबादेवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना केली. प्रतिदिन विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर रास गरबा व दांडियाचे आयोजन केले आहे. सायंकाळी आरतीनंतर दांडिया रासचे आयोजन करण्यात येते. गेल्या 22 वर्षांपासून सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करणारा जगदंबा ग्रुपने या वर्षी हुबेहुब केदारनाथ मंदिराचा देखावा उभा केल्याने भाविक वर्ग भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. दरम्यान सातव्या, आठव्या व नवव्या माळेला भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नियोजन केल्याची माहिती जगदंबा ग्रुपचे संस्थापक राकेश थोरात, अध्यक्ष प्रवीण जाधव, घनश्याम शर्मा, अजित थोरात, कुणाल बोथरा, निशांत समदडिया, मुकेश कुसवाह, अक्षय थोरात, निखिल पारख, भावेश पारेख, आदेश बाफणा व पदाधिकारी यांनी दिली.

हेही वाचा :

The post Navratri 2023 : वणीत अवतरले केदारनाथासह अमरनाथ appeared first on पुढारी.