Needle Free Vaccine : नाशिक-जळगाव जिल्ह्यात ‘नीडल फ्री’ लसीकरण; अशी देणार लस

Needle Free Vaccine : लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. नीडल फ्री अर्थात सुईशिवाय देण्यात येणाऱ्या लशीसाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. 'झायकोव -डी' या लशीचे नीडल फ्री डोस देण्यात येणार आहेत. 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक आणि जळगावला जवळपास 8 लाख डोस मिळणार आहेत.

झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए आधारित कोविड लस आहे. या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस आहे. ही लस तीन डोसची लस आहे, दिवस 0, दिवस 28 आणि दिवस 56 अशाप्रकारी ती दिली जाते. काही दिवसांपूर्वी भारताच्या औषध नियंत्रकाने झायडस कॅडिलाच्या स्वदेशी विकसित नीडल-फ्री कोविड-19 लस, ZyCoV-D च्या आपत्कालीन वापरामध्ये (EUA) 12 ते 18 वयोगटातील लोकांना देण्यास मान्यता दिली होती.

ZyCoV-D ही लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येईल आणि त्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता नसेल. यामुळेच या लसीचे डोस सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. दरम्यान, केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 69% लोकांना कोविड-19 लसीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि 25% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.