Site icon

Nitesh Pandey Death : मालिका विश्वात शोककळा! अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपरिषद हद्दीत असलेल्या हॉटेल ड्यू ड्रॉप येते मंगळवारी रात्री मुक्कामास थांबलेले हिंदी सिनेसृष्टी व टीव्ही मालिकांमधे काम करणारे सिने अभिनेते नितेश पांडे यांचा मृत्यू झाला आहे. ‘अनुपमा ‘ मालिकेत रुपाली गांगुली हीच्या मैत्रीणीच्या पतीची भुमिका साकरणाऱ्या या कलाकारच्या मृत्युमुळे चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.

इगतपुरी येथील ड्यु ड्रॉप हॉटेलमध्ये अभिनेते नितेश पांडे कामानिमित्त थांबले होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या रूममध्ये हॉटेल स्टापने फोन केला असता पांडे यांनी फोन उचलला नाही. पांडे हे काही कामात असतील म्हणून वेटरने पुन्हा रात्री पावणे बाराच्या सुमारास रूमच्या फोनवर फोन केला तसेच त्यांच्या खाजगी मोबाईलवर फोन केला. मात्र नितेश पांडे यांनी फोन व मोबाईल दोन्ही उचलले नाही. यामुळे हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी सदर घटना हॉटेल मॅनेजर यांना सांगितली. हॉटेल मॅनेजर यांनी दुसऱ्या चावीने रूमचा दरवाजा उघडला असता नितेश पांडे हे त्यांच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळले. तेथून त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आले परंतु इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नितेश पांडे यांच्या निधनाने टीव्ही सिरीयल इंडस्ट्री मुंबई व फिल्म इंडस्ट्री मुंबई यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. नितेश पांडे यांचे वय अंदाजे ५२ वर्ष आहे. इगतपुरी येथे ते स्टोरी रायटिंगसाठी नेहमी येत असत. मंगळवारी रात्री त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली व हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेचा पुढील तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे व त्यांचे कर्मचारी करीत आहे.

हेही वाचा :

The post Nitesh Pandey Death : मालिका विश्वात शोककळा! अनुपमा फेम अभिनेते नितेश पांडे यांचे निधन appeared first on पुढारी.

Exit mobile version