Online Fraud : म्हणे अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यास पैसे दुप्पट होतील, दीड लाखांचा घातला गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यास पैसे दुप्पट होतील, असे आमिष दाखवून एकाने युवकास दीड लाख रुपयांना गंडा (Online Fraud)  घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विवेक ओमप्रकाश सिंग (24, रा. मोरवाडी) यांनी अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

विवेक यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान गंडा घातला आहे. @गोशॉप 66 या अ‍ॅपच्या मालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. विवेक यांनी एका संकेतस्थळावर जाऊन अ‍ॅप इन्स्टॉल केले. तेथे भामट्याने विवेकला 30 पायर्‍या असून, प्रत्येक पायरी पूर्ण झाल्यानंतर पैसे दुप्पट होतील व त्यावरील कमिशन अ‍ॅप्लिकेशनच्या वॉलेटमध्ये जमा होईल, असे आमिष दाखवले. हे पैसे पाहिजे तेव्हा काढता येतील, असेही सांगितले होते.

त्यानुसार विवेक यांनी 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाइन पद्धतीने एक लाख 58 हजार 945 रुपये अ‍ॅपवरून भरले. त्यानंतर पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे त्याने गोशॉप 66 या अ‍ॅपवर संपर्क केला. मात्र, त्यांनीही पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हेही वाचा :

The post Online Fraud : म्हणे अ‍ॅप्स इन्स्टॉल केल्यास पैसे दुप्पट होतील, दीड लाखांचा घातला गंडा appeared first on पुढारी.