Petrol Protest Nagpur : इंधनावरील कर कपातीसाठी भाजप आक्रमक, ठाकरे सरकार विराधात राज्यभरात आंदोलनं

<p>केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले, मात्र महाराष्ट्र सरकारनं व्हॅट कमी न केल्यानं इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर तसेच आहेत. त्यामुळं भाजप आक्रमक झाली असून नागपूरमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाल्याचं पाहायला मिळालं.&nbsp;</p>