PHOTOS : नाशिकच्या पांडवलेणी डोंगरावर अडकलेल्या तिघांना रेस्क्यू करण्यात यश

नाशिक : पांडवलेणी डोंगराच्या पूर्व बाजूस असलेल्या सुळक्यावर तीन पर्यटक अडकले होते. त्या तिघांचेही  रेस्क्यू करण्यात आले आहे. हे तिघेही सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे.

डोंगरावर तिघे अडकल्याची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दल आणि वैनतेय गिरिभ्रमण संस्थेची टीम संबंधित ठिकाणी पोचली. या युवकांना खाली सुखरूप उतरवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अत्यंत अवघड अशा ठिकाणी हे युवक असल्याने रेस्क्यूसाठी मोठा वेळ लागण्याची शक्यता होती. 

डोंगराच्या माथ्यावर आयुष तुळसकर (२०), सुमित तुळसकर (१७), समर्थ सिल्लर (१७) रा. पाथर्डी फाटा ही मुले पांडवलेणीच्या डोंगरावरुन उतरत असताना अडकून पडली. चढाई करणारे तिघे हौशी मुले दुपारी (ता.२५) साडेबारा वाजेच्या सुमारास डोंगरावर चढले. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोहचली; मात्र त्यांना उतरताना धाडस कमी पडू लागले आणि वाळलेल्या रानगवतावरुन पाय घसरु लागल्याने त्यांनी माथ्यावरच दगडांचा आधार घेत मोबाईलद्वारे पोलीस नियंत्रण कक्ष व मनपा अग्निशमन दलाकडे मदत मागितली.

घटनेची माहिती मिळताच तत्काळ सिडको अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळ दाखल झाले. तीनही मुले डोंगराच्या माथ्यावर अडकलेले असल्यामुळे जवानांनी त्यांना भोंग्यावरुन सुचना देत धीर दिला आणि दोरखंड व जाळी घेऊन जवानांनी आता डोंगरावर चढाई करण्यास सुरुवात केली होती. पुढील काही तासाभरात तीनही मुलांना सुखरुप रेस्क्यू करुन डोंगराच्या पायथ्याशी आणण्यास जवानांना यश आले, 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ