डीजीपी नगर (नाशिक) : सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणे आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या मूलवड परिसरात वर्षानूवर्षापासून आणि जन्मत:च पाणी टंचाई ही ह्या भागातील जनतेच्या जणू पाचवीला पूजल्यासारखी आयुष्यभरासाठी सोबतीलाच आहे अशी परिस्थिती जानेवारी महिन्यापासूनच सुरू होते. त्यासाठी हंडाभर पाण्यासाठी तारेवरची कसरत करीत वणवण करायची येथील बालगोपाळापासून वयोवृद्ध यांच्या रोजचीच ठरलेली आहे.
हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात
मूलवड ग्रुप ग्रामपंचायत पैकी वळण,घोडबारी, सावरीचा माळ,परिसरातील साधारणपणे ३ हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या भागात जानेवारी महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
गेली अनेक दिवसांपासून सातत्याने ग्रामस्थांनी टँकर सुरू मागणी करून ही टँकर सुरू झाली नाही, ग्रामपंचायतने पाणी पुरवठा योजना राबवून त्याचा गावकऱ्यांना फायदा नाही, योजना नावाला असून राबवून त्या योजनेचा परिसरातील रहिवाशांना लाभ मिळालेला नसल्याने आणि मागणी करूनही ग्रामसेवक दाद देत नसल्याने ग्रामसेवकां विरोधात नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे.
हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर
पाचवीला पुजलेली पाणीटंचाई
या भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून पाणी टँकर पोहचू शकेल यासाठी आणि याभागातील जनतेला शहरापर्यंत पोहोचणे सुखकर व्हावे म्हणून रस्त्यांचे दुरुस्ति करणे गरजेचे आहे. गाव विहिरीत पाणी सोडले जात नाही, जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू असून पाणीपुरवठ्याची सुविधा पाणी टँकर आठ दिवसाच्या आत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा , माजी सरपंच सीताराम घाटाळ, भगीरथ घाटाळ, माजी सदस्य मिराबाई घाटाळ,रामजी घाटाळ, सुनील बरफ ,सुनील नामेडे,सुनील बरफ आदींनी दिला आहे.
हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर
गेली अनेक वर्षांपासून पाणी टंचाई चा सामना आम्हाला करावा लागत असून पाणी पुरवठ्याची कायम स्वरूपी उपाययोजना गरजेचे आहे ग्रामसेवकलक्ष द्यायला तयार नाही याबाबत गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून पाण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी.- सीताराम घाटाळ (माजी सरपंच मूलवड)
आमच्या घरात सून मूल बाळंत झाली की २/४ दिवसाचं बाळ घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते ,शहरात तुम्ही बारसं पाचवी पूजतात पण आमच्याकडे मुलांच्या जन्माच्या पाचवी पासून च पाणी टंचाई पाचवीला पुजावी लागते- सुमन पवार, हरसूल