नाशिक : जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाला वाटते आहे. मंगळवारी आर्द्रता ७४ टक्के राहिली. ती येत्या तीन दिवसांमध्ये ६९, ६७, ६६ टक्के राहण्याचा विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, हवेतील गारठा कमी झालेला असताना पावसाने उघडीप दिल्याने सूर्यनारायणाचे सूर्योदयाला दर्शन घडेल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात सोमवारी (ता. १४) रात्रीपासून धुक्याची दुलई शहराने पांघरली होती. सकाळी दहाला गोदाकाठच्या रामकुंड परिसरात धुके पसरले होते. त्यामुळे जणू उत्तराखंड असल्याचा ‘फील’ येत होता.
रात्रीपासून शहराने पांघरली धुक्याची दुलई
ढगाळ हवामानाबरोबर पावसाची हजेरी अन् आर्द्रता वाढल्याने द्राक्षे, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. नुकसानीचा आकडा वाढत असताना मंगळवारी (ता. १५) सूर्यनारायणाने दर्शन दिलेले असताना शहरासह जिल्हा धुक्याच्या दुलईने लपेटलेला होता. अशातच, आता हवामान विभागाने बुधवार (ता. १६)पासून शनिवार (ता. १९)पर्यंत अंशतः ढगाळ, तर रविवारी (ता. २०) पुन्हा ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ