
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य पोलिस दलात पोलिस भरती प्रक्रिया (Police Recruitment) राबवली जात असून, राज्यात १४ हजारांहून अधिक पदांसाठी, तर नाशिक ग्रामीण पोलिस दलात १७९ पदांसाठी भरती सुरू आहे. नाशिक ग्रामीणला १७९ पदांसाठी तब्बल २१ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज आले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेतील स्पर्धा कमालीची वाढली आहे. येत्या सोमवार (दि.२)पासून उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे.
नाशिक ग्रामीणमध्ये १६४ पोलिस शिपाई व १५ चालकांची पदे भरण्यात (Police Recruitment) येत आहेत. त्यासाठी अर्ज पडताळणी पूर्ण झाली असून, मैदानी चाचणीसाठी उमेदवारांचे स्लॉट करण्यात आले आहेत. दोन ते २० जानेवारीदरम्यान आडगाव येथील ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे. २ व ३ जानेवारी रोजी चालकपदांच्या उमेदवारांची चाचणी होईल. यानंतर शिपाई पदाची चाचणी होणार आहे. त्यासंदर्भात वेळापत्रक जाहीर झाले असून, उमेदवारांनाही कळवण्यात आले आहे. मैदानी चाचणीनंतर मुंबई वगळता राज्यभरात एकाच दिवशी लेखी परीक्षा होणार आहे.
- महिंद्राच्या वाहननिर्मिती प्रकल्पासाठी दौंडच्या नेतृत्वाने प्रयत्न करावेतमैदानी चाचणीवर सीसीटीव्हीचे लक्ष
मैदानी चाचणीसाठी उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हींद्वारे लक्ष ठेवून चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुमारे ५०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही तैनात असेल. खबरदारी म्हणून रुग्णवाहिका, पोलिस व्हॅनचा बंदोबस्त करण्यात येणार असून, डॉक्टरांचेही पथक राहणार आहे.
हेही वाचा :
- पुणे : विक्रम गोखलेंच्या पुरस्कारांचे जतन करणार
- नगर : बोर्ले गावात सव्वा लाखाची घरफोडी
- नगर : बोर्ले गावात सव्वा लाखाची घरफोडी
The post Police Recruitment : नाशिक ग्रामीणला पोलिसांच्या १७९ पदांसाठी २१ हजार अर्ज appeared first on पुढारी.