Prasad Lad शरद पवार यांनी वेळोवेळी संधी दिली, सांगायला प्रसाद लाड विसरले नाहीत : ABP Majha

विधान परिषदेच्या दहा सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ते काल निवृत्त झाले. प्रसाद, लाड विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यासारख्या नेत्यांना काल निरोप दिला गेला. या निरोप समारंभात सर्व नेत्यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. मात्र त्यात सर्वाधिक गाजलं ते प्रसाद लाड यांचं भाषण.. आपलं लहानपणीचं आयुष्य, लग्नाचा किस्सा सांगताना प्रसाद लाड टाळ्या मिळवून गेले ."शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी वेळोवेळी संधी दिली, असं सांगताना ही नावं मी आज मुद्दामून घेणार असल्याचं सांगायला प्रसाद लाड विसरले नाहीत.