Pune : Ajit Pawar यांच्या 3 बहिणींच्या घरी Income Tax विभागाची छापेमारी : ABP Majha

<p><strong>मुंबई :&nbsp;</strong>आयकर विभागाने कुठे छापेमारी करावी हा त्यांचा निर्णय आहे. माझ्या संबंधित असलेल्या कंपन्यांचे सर्व कर वेळेवर भरले जातात. मी स्वत: अर्थमंत्री असल्यानं याची काळजी घेतो. &nbsp;आता ही रेड इन्कम टॅक्स विभागाने राजकीय हेतूपोटी टाकली याबाबत तेच सांगू शकतील. माझ्या नातेवाईकांच्या संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. आता ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचं मला वाईट वाटतं, असं अजित पवार म्हणाले.&nbsp;</p> <p>अजित पवार म्हणाले की, माझ्या बहिणींशी संबंधित संस्थांवर धाडी टाकल्या. त्यांचं लग्न झालं, सुखी संसार आहे. त्यांचा दुरान्वयेही राजकारणाशी संबंध नाही. &nbsp;ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. याचं मला वाईट वाटतं, असं ते म्हणाले. &nbsp;इतक्या खालच्या पातळीवरच राजकारण होतं आहे, हे वाईट आहे, असं ते म्हणाले.&nbsp;</p>