Raj Thackeray Chandrakant Patil Meet : चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

<div dir="auto">नाशिक दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यांत सकाळी 10 ते 15 मिनिटे भेट झाली. दोन्ही नेते 3 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये दाखल झाले होते. दोघांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच होता, त्यामुळे शुक्रवार पासूनच या दोघांच्या भेटीची शक्यता व्यक्त होत होती, अखेर रविवारी सकाळी उभयतांमध्ये भेट झाली, मनसे आणि भाजप यांची नाशिक महापालिकामध्ये 2012 ते 2017 या पंचवार्षिक ला सत्ता होती.&nbsp; यानंतर भाजपने बहुमताचा आकडा गाठला तर मनसे ची सदस्य संख्या 40 वरून 5 वर आली.&nbsp; राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यानं मनपा निवडणुकीत भाजपला&nbsp; तिन्ही पक्षांकडून लक्ष्य केले जाणार आहे. त्यामुळे आहे ती सत्ता राखण्यासाठी भाजप आणि गेलेली सत्ता पुनः प्राप्त करण्यासाठी मनसे कामाला लागली आहे. दोन्ही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वन टू वन चर्चा करून सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. दोन्ही पक्षांना मनपा निवडणुकीत एकमेकांची गरज&nbsp; लागण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे राज आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय. चंद्रकांत पाटील यांनी भेट अनौपचारिक होती जुनी मैत्री आहे असे सांगत चर्चेचा तपशील सांगितला नसला तरी नव्या समिकरणांची पायाभरणी म्हणून या भेटीकडे बघितले जात आहे. जुनी मैत्री मनपा निवडणुकीच्या राजकारणात ही दिसणार का येत्या काळात काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागलाय . राज नाशिकचा दौरा आटोपून पुण्याला जात असताना चंद्रकांत पाटील नियोजित भेटी गाठीसाठी निघाले असताना सकाळी ही भेट झाली.</div>