Raksha Bandhan: माहेरवाशिणींसाठी लालपरी’चे नियोजन

नाशिक: लालपरी रक्षाबंधन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाऊ-बहिणीचे अतुट नाते दर्शविणारा सण म्हणजे रक्षाबंधन. गुरुवारी (दि.11) सर्वत्र रक्षाबंधन सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माहेरवाशिणींची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक विभागातून जादा बसेस सोडण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

सण-उत्सवाच्या काळात एसटीला नेहमीच प्रवाशांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची नेहमीच गर्दी बघावयास मिळते. रक्षाबंधनासाठी माहेरी जाणार्‍या नववधूंसह महिलांची गैरसोय टाळण्यासाठी बुधवार (दि.10)पासून धावत आहे. मुख्य शहरासह ग्रामीण भागातून प्रवाशांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रक्षाबंधनासाठी अहमदनगर, शिर्डी, कळवण, सप्तशृंगगड, कळवण, औरंगाबाद, कसारा आदी मार्गांवर जादा बस सोडण्यात येणार आहेत. पुणे, धुळे आणि नंदुरबारसाठी नाशिकहून 50 पेक्षा जास्त जादा बस धावणार आहेत. सटाणा, कळवण, मालेगाव या ग्रामीण भागात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पूर्ण क्षमतेने वाहतूक केली जाणार आहे. प्रवाशांच्या संख्येनुसार बस सोडण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Raksha Bandhan: माहेरवाशिणींसाठी लालपरी'चे नियोजन appeared first on पुढारी.