Raksha Bandhan : या अनोख्या राख्यांची सर्वत्र चर्चा; राखी बनवणाऱ्या मैथिली कुलकर्णीशी बातचीत

<p>&nbsp;उद्या रक्षाबंधन आहे.. आणि प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी खास राखी खरेदी करण्याच्या बेतात असेल.. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या मैथिली कुलकर्णी हिने तर अनेक हटक्या राख्या बनवल्या असून सोशल मीडियात या राख्यांची सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.. भावाला आवडेल किंवा त्याच्या व्यवसायानूसार बहिणी मैथिलीला राखीची ऑर्डर देतात.. आणि मैथिली त्यानूसार त्या तयार करते.. गेल्या आठवडाभरात लॅपटॉप, मसाला डोसा, मिठाई, फुटबॉल, टेनिस, पिझ्झा, वडापाव अशा राखी तिने बनवल्या आहेत..</p>