Remdesivir Theft : नाशिकच्या खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरची चोरी, PPE किट घालून वॉर्डबॉयकडूनच डाका

<p>नाशिक शहरातील एका हॉस्पिटलमध्ये चक्क रेमीडिसिव्हर औषधांची चोरी झाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच दोन रेमडेसिवीरचे इंजेक्शन चोरल्याची घटना घडली आहे. गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार एकीकडे तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोरोना बरा होण्यासाठी सध्या रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणावर आधार आहे. रेमडेसिवीरचा तुटवडादेखील जाणवतो आहे, त्यामुळे यो चोरीच्या घटना घडत आहेत.</p>